Comments

सांगलीतील आठवडे बाजार

--सौ.सुधा कुलकर्णी, विश्रामबाग,सांगली.
घरातील प्रेत्यक कुटुंबांच - कुटुंबातील प्रत्येक गृहीणीचं या आठवडे बाजाराकडे लक्ष असतं,काय असतं या आठवडे बाजारात? काय असतं आणि काय नसतं ह्याचा विचार पुढे मांडणारच आहे.पण आठवडे बाजार हा इतका सर्वाच्याच अंगवळणी पडला आहे की,असा बाजार कधी आहे ह्याकडे विशेषता गृहिणीचे लक्ष लागून राहते.आणि कारणही तसच असतं,दिवस उगवल्यापासून गृहीणींना प्रश्न पडतो.आज नाष्टा काय करता येईल ? जेवताना आज भाजी कोणती करावी लागेल ?मुलांच्या अथवा पतिराजांच्या आणि नोकरी करणारी स्त्री असली तर स्वत:च्या डब्यात भाजी करणं कोणती अधिक सोयीच होईल ? आजच्या अशा या प्रश्नांना मग स्त्री वळते ती आपल्या घरातील फ़्रिजकडे ! चार आठ दिवसांची भाजी एकदा आठवडे बाजारातून आणली की,तो आठवडा निवांत जातो गृहीणीचा.(At hand Ready)म्हणजे हाताशीच सर्व असल्याने तिच्या अन घरातल्या सगळ्यांसाठी ती मेनू ठरवून टाकते अन तशीच त्या त्या कामाला लागत असते.हे अगदी घरोघरी दिसणारे चित्र आहे.म्हणूनच भगिनीवर्ग आठवडे बाजारावर खूप अवलंबून असतो.
प्रथमत: म्हणजे आपल्या लहानपणी आठवडे बाजार हा लहानसहान खेड्यांतच भरलेला आपण पहात होतो-नाही ? पण आता-आता सुधारीत शहरांत सुध्दा हा आठवडे बाजार भरलेला आपण आज पहातोय,ह्याचं काय कारण ?
तर लहानसहान शहरं जशी वस्तीने वाढत गेली विस्तारीत होऊ लागली,दूरदूरच्या लोकवस्तीतून गृहसंकूलं ऊभी राहू लागली तसतशा तेथे रहाणार्‍या मूळ शहरांपासून दूर रहाणार्‍या लोकांना गरजा वाढू लागल्या. आपल्या बंगल्याजवळ,आपल्या गृहसंकूलाला जवळ कुठे काय मिळल कां ? याच शोधात साहजिकच जनता शोध घेत राहिली.मनुष्य स्वभाव असा आहे की,जवळ कुठे काय मिळेल आपल्याला दैंनदिन जीवनासाठी ? अगदी आपल्या घराजवळ ,फ़ारसा आटापिटा म्हणजे बसने,दुचाकीने,चारचाकीने न जाताही सहज चालण्याच्या टप्प्यात आणि ते ही फ़ारसा वेळ न घालविता आपल्याला कसं मिळेल ह्याचाच जणू शोध घेत असतो.
मग यावर उपाय काय ? तर त्या त्या विस्तारीत क्षेत्रात एकेका दिवशी (आठवडयातील) बाजार भरुं लागला.यांमुळे लोकांची सोय तर होतेच पण जवळपासच शेतकरी ही आपल्याला शेतांतील भाजीपाला घेऊन त्या त्या दिवशी विक्रीसाठी येऊ लागला.ह्यात शेतकर्‍याचा जसा विक्रीमुळे फ़ायदा होऊ लागला तसा सर्व जनतेचाही वेळ व पैसा वाचविणे हा तर मनुष्य स्वभावच बनून गेलाय नं ?
अशाच एका सांगली शहरासंबधी मला सांगायंच आहे.गेल्या १५/२० वर्षात सांगली शहर प्रत्येक दिशेनं वाढू लागलं आहे,प्रत्येक दिशेला उत्तर -दक्षिण, पुर्व-पश्चिम असं मोकळ चाकळ हात पसरुन वाढू लागलयं.प्रत्येक दिशेला निरनिराळी उपनगरं, बंगले ,प्लॅट सिस्टीम,सदनिका,गृहसंकूल, वाढू लागलेली दिसतात.
प्रत्येक विस्तारीत नगरांत भाज्यांचे लहान मोठे स्टॉल्स,मॉल्सही दिसू लागली आहेत .आज सांगली शहरांपुरतं बोलायचं झालं तर येथील लोकसंख्या आज जवळपास अंदाजे ५ ते ६ लाखांपर्यत पोचली आहे.आणि म्हणूनच छोटे छोटे बाजार ,मॉल्स,किराणा बाजारांची गल्लीप्रत,ऎकेक दुकाने सहज दिसून येतात.हे रोजच्या व्यवहारात आपण पाहतोच.विस्तारीत भागात लहान मोठे मॉल्स,दुकानं,दूध डेअरी जशी वाढू लागलीत तसेच आठवडयांचा बाजारही त्या त्या भागात भरू लागला आहे.अगदी सांगली शहरापुरतं बोलायच झालं तर सांगली शहरापासून ३ते४ किलोमीटरवर विश्रामबाग,पुढे वानलेसवाडी ,दक्षिणेकडील गर्व्हमेंट कॉलनी, पूर्वेस वारणाली विजयनगर ,तर उत्तरेकडील कुपवाड,या सर्व दिशांना अनेक वसाहती-अपार्टमॆंटस,(सदनिका),गृहसंकुल आणि लहाममोठे बंगले वाढतच आहेत.म्हणूनच सांगली नगरपरिषदेचं रुपांतर महापालीकेत झालं.
सांगली महापालीका अस्तित्वात आल्यापासून डोंळ्यात भरणारी आणि सदैव स्वागर्ताह असणारी एक मोठी सुधारणा म्हणजे सांगली शहरांतील विस्तारीत भागांत कोणत्या तरी एका दिवसांत त्या त्या भागातील लोंकाच्या सोयीसाठी भरवला जाणारा आठवडे बाजार. महापालीकेचा निर्णय म्हणूनच जनतेला खुप सुखावून जातो आहे.तेही विशेषता स्त्री वर्गाला ,म्हणूनच महापालिकेचं प्रथम अभिनंदन करुनच पुढे जायचं आहे मला.
आता हेच पहानां आठवडयातील सातही वार या आठवडे बाजार भरण्यांत व्यसत असतात.सांगलीतल्या कोणत्याही एका उपनगरांत वा दाट लोकवस्तीच्या भागांत आठवडयातील कोणत्या ना कोणत्या एका वारी हा बाजार भरलेला असतो.महापालीकेनं त्या त्या भागांत एकेक वार ठरवून दिल्याने त्या त्या भागांत त्याच दिवशी लहानमोठया प्रमाणात आठवडे बाजार भरत असतो.आता आपण प्रत्येक वाराला कुठे कुठे बाजार भरतो हेच पाहू या ना !
रविवार - विश्रामबाग मधील १०० फ़ुटी रोडवर भरणारा आठवडे बाजार, हा बाजार बर्‍यापैकी मोठया प्रमाणात भरलेला असतो.
सोमवार - पुलाखालील स्टेशन समोरुन जाणार्‍या रस्त्यावरुन पुढे शिंदे मळ्याजवळून जाणार्‍या रस्त्यावर हा बाजार भरलेला असतो.बुधगांव, माधवनगर, या सारख्या विस्तारीत भागांतही असाच बाजार एका ठरविल्या दिवशी हमखास भरतोच.
मंगळवार - विश्रामबाग मधील जिल्हापरिषद अध्यक्षांच्या बंगल्यावरून जाणार्‍या व रेल्वेपुलावरुन सरळ खाली जाणार्‍या रस्त्यावर भरला जाणारा हा आठवडे बाजार, हाही बाजार बर्‍यापैकी मोठा असतो.
बुधवार - विश्रामबागजवळच असणारी वानलेसवाडी, विजयनगर या भागांतील जनतेसाठी जवळच असणार्‍या पुलाजवळ भरतो.
गुरुवार - सांगलीच्या मध्यवस्तीत,दाट असणार्‍या वस्तीसाठी चांदणी चौकात भरणारा आठवडे बाजार,हा बाजारही मोठया प्रमाणात भरलेला आपण पहातोच आहोत.
शुक्रवार - विश्रामबाग मधील वारणाली वसाहत व जवळपास असणार्‍या वसाहतींसाठी भरला जाणारा वारणाली रोडवर हा बाजार थोडया लहान प्रमाणात असतो.पण ह्याचेही पुढे पुढे मोठया प्रमाणात रुपांतर होणार नक्कीच.
शनिवार - ह्यात शनिवारी गर्व्हमेंट कॉलनी येथे ही आठवडे बाजार असतो.सांगलीतील प्रमुख मोठा भरविला जाणारा बाजार, सांगलीतल्या महानगरपालीका, पोलीस चौकी पासून सुरु होणारा हा बाजार कापडपेठ, सराफ़कटा, मारुतीरोडकडे जाणारा रस्ता ते थेट सांगलीवाडीकडे जाण्याचा रस्त्यापर्यंत हा बाजार मोठयाप्रमाणात भरलेला आपण प्रत्येक शनिवारी पहात असतोच. या आठवडे बाजारात काय नसतं तर उत्तर आहे सर्व काही असतं.जरा सावकाश हा बाजार फ़िरुन या ना की, आपल्या नजरेला काय काय दिसतं पहा, म्हणजे माझ्या म्हणण्याची प्रचीती येईल.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments: