Comments

सांगली हायस्कूलचा इतिहास (सांगली हायस्कूल डॉट कॉम या वेबसाईटवरून)

कृष्णा नदीच्या काठावरील सांगली हे छोटसं ओबड धोबड असणारं गांव. १८०१ साली पहिले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपले मिरज संस्थानापासून वेगळे राज्य बनवले. त्याची राजधानी म्हणून `सांगली' निवडली. तेव्हापासून संगीत, कला, संस्कृती, शिक्षण, उद्योग, व्यापार या क्षेत्रात सांगलीच्या विकासाला सुरुवात झाली. कात्र आधुनिक सांगलीचा खरा पाया घातला तो १९०३ साली गादीवर आलेल्या प्रागतिक आणि उदारमतवादी दुसऱ्या चिंतामणराव आण्णासाहेब पटवर्धन यांच्या काळात.

शिक्षण हेच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाचा पाया असल्याने क्षिणाचे महत्व ओळखून श्रीमंत धुंडीराज उर्फ तात्यासाहेब पटवर्धन यांच्या काळात सांगली संस्थानात शिक्षणाला सुरुवात जाली. तो काळ होता १८६१ चा. १८६४ साली सांगली इंग्लिश स्कऊलची स्थापना झाली. १८६५ साली वेदशाळेची स्थापना झाली.

ऋग्वेद, यजुर्वेद, न्याय, व्याकरण, ज्योतिष अशी शास्त्रे शिकविणाऱ्या वेदशाळा काढण्यात आल्या. मराठी शाळा सुरू झाल्या. वेदशास्त्राच्या प्रभावामुळे सांगलीत संस्कृत विद्येचा प्रसार मोठया प्रमाणात झाला. देवधरशास्त्री, पाटीलाास्त्री, के. जी. दीक्षित अशा नामवंत शिक्षकांनी मुंबई विश्वविद्यालयांच्या परिक्षांमध्ये, संस्कृत विषयात जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपराच सांगलीत निर्माण केली. त्या कालात इंग्लिश स्कूल ही एकमेव सरकारी शाळा होती. याच ााळेची पुढे १८८४ साली सांगली हायस्कूल, सांगली या नावाने एकमेव सरकारी शाळा सुरू झाली. सध्याचे दिवाणी न्यायालय ज्याठिकाणी सुरू आहे. त्याठिकारी सांगली हायस्कूल सुरू होते. त्यासाठीच ती इमारत बांधली असावी. असा उल्लेख आढळतो. स्व. आण्रासाहेब लठ्ठे, गुरुनाथ गोविंद तोरो, शीघ्र कवी ळ गोविंद मुजुमदार उर्फ साधुदास, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक संगीतज्ञ प्रा. ग. ह. रानडे, केशवसुत संप्रदायाचे अध्वर्यु धोंडो वासुदेव गद्रे तथा कवी काव्यविहारी, तसेच काही काळ सांगलीत राहिलेले ज्ञानपीठ पारितोकि विजेते थोर साहित्यिक वि. स. खांडेकर याच ठिकाणी शिक्षण घेत होते असे दिसते. तर मुख्याध्यापक वासुनाना खाडिलकर आरि शिक्षक म्हणून श्रीपादशास्त्री देवधर, शंकरशास्त्री केळकर, पाटीलशास्त्री, मुदगलकर आपल्या विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा अणि प्रोत्साहन देत होते. त्यामुळेच स्व. आण्णासाहेब लठ्ठे पुढे इंग्रजी वियाचे प्राद्यापक, छ. शाडू महाराजांचे विद्याधिकारी, छ. राजाराम महाराजांचे राजकीय सल्लागार, कोल्हापूर संस्थानचे दिवाण झाले. तसेच मुंबई प्रांताचे पहिले अर्थमंत्री झाले. तर सिटी हायस्कूलच्या चार संस्थापकांपैकी गुरुनाथ गोविंद तोरो हे याच शाळेचे विद्यार्थी, ज्यांनी कृेणाकाठच्या राम मंदिरात राहून माधुकरी मागून सांगली हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि कवि काव्यविहारी ज्यांनी आपल्या साहित्यातून भारतमातेवरील श्रद्धा निर्माण केली आणि आपल्या काव्यातून क्रांतीकारकांना प्रेरणा दिली.

परदास्याची बेडी होती पायी तव जेधवा
पुत्र शहाणे तुझे दंगले संसारी तेधवा
काही वेडी तयाची भडकुनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे

या कवितेतून त्यांची श्रद्धा दिसून येते. सांगली हायस्कूलच्या सुरुवातीच्या या विद्यार्थी आणि शिक्षकांनी सांगली हायस्कूलला शिक्षण क्षेत्रात वैभव प्राप्त करून दिले.
१९०७ नंतर सांगली हायस्कूल या सरकारी शाळेला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले. १९०५ ते १९१० या पाच वर्षात दुसरे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या काळात संस्थानचे प्रशासक क्रॅप्टन बर्क यांच्या कल्पकतेतून जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयाची इमारत, तसेच नगरपालिका आणि सांगली हायस्कूलची सध्याची इमारत अशा इमारतींची बांधकामे झाली आणि सांगलीच्या वैभवात ऐतिहासिक भर पडली. इंग्रजी८ या अक्षराप्रमारे इमारतीची रचना, भार ( वजन) विभागणीसाठी कमान पद्धत, चार खोल्यानंतर एक हॉल, उंच वर्गखोल्या, नैसर्गिक वायूजिन, भरपूर सागवानी लाकडांचा वापर, इमारतीच्या दर्शनी बाजूस एकशे दहा फूट उंचीची कमान, त्यावर लकलखता कळस, तरफेवर चालणारे घड्याळ, कमानीच्या दोन्ही बाजूस ओतीव बीडाचे चक्राकार जिने, इमारतीच्या दर्शना भागावर ३२ पाकळयांचे कमळ, सिहाची प्रतिकृती, विकटोरिया क्रॉस, नाजूक नक्षीकाम अशी या इमारतीची लक्षवेधक वैशिष्ट्ये ! आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण इमेरत बांधकामासाठी अत्यंत चिवट अशा चुन्याचा वापर केला गेला आहे. उत्तम दर्जाची चुनखडी, भाजरव विटांचा चुरा, कात, गूल यांच्या मिश्रणातून चुना तयार करून बांधकामासाठी वापरला गेला आहे. गोविंददास आणि केशवदास शेडजी या बंधूनी ब्रिटीश शास्त्रानुसार ही इमारत बांधलेली असून या इमारतीने नुकतीच आपली शताब्दी साजरी केली आहे. या शंभर वर्षात या इमारतीने असंख्य राजकारणी, समाजकारणी, उद्योजक, साहित्यिक, नामवंत खेलाडू, तंत्रज्ञ असे कीर्तीमान, बुद्धीमान विद्यार्थी घडवले आहेत. या विद्यार्थ्यांना मायेची सावली देणारे, मित्रत्व फुलविणारे, चिंतनशीलता वाढविणारे आणि मागे वळून पहायला लावणारे दुसरे वैशिष्टय म्हणजे ााळेच्या प्रांगरातील चिंचेचे झाड!. एखाद्या वृक्षाचे कमाल वय किती असते याचा विचार करायला लावरारा हा चिंचवृक्ष, गेल्या १०० वर्षात असंख्य विद्यार्थ्यांनी चिंचेसाठी, लपण्यासाठी त्याच्या खोड्या काढल्या असल्या तरी जाणाऱ्या खोडसळ, प्रेमळ मेजी विद्यार्थ्यांच्या स्मृती जपत आजही तो उंच आकाशी झहपावत सतत वाढत्या संक्येने येराऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपले पंख पसरतो आहे.. प्रसिद्द थोर साहित्यिक वि. स. खांडेकर तसेच भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांच्या स्मृती लपलेल्या आहेत. या वृक्षाच्या छायेत वि. स. कांडेकर यांची साहित्यिक, लेखक आणि हुशार विद्यार्थी म्हणून जडणघडण झाली असावी.ललीत लेखनाला पोषक अशी सौंदर्यदृष्टी, चिंतनाीलता, निसर्गप्रेम त्यांना या परिसरातच मिळाले असावे. कारण २२ डिसेंबर १९१३ रोजी वि. स. खांडेकर सांगली हायस्कूलमधून मॅट्ृीक पास होऊन मुंबई विश्वविद्यालयात त्यांचा आठवा नंबर आला होता. तेव्हाचे संस्कृत शिक्षक श्रीपादशास्त्री देवदर आणि मराठी शिक्षक शंकरशास्त्री केळकर यांच्या रसाळ वाणीने कांडेकरांना मराठी आणि संस्कृत वाचनाची गोडी लागली. त्यांच्यातला लेखक फुलत गेला.
क्रिकेट आणि गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी ही शाळा. गायन हॉल, व्यायामशाळा, क्रिकेटचे सुसज्ज मैदान हे या शाळेचे तिसरे वैशिष्ट्य ! हरि गणेा करमरकर हे या शाळेचे महिले मुख्याध्यापक, नाट्यचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राजकवी साधुदास, चित्रकार देवल, तालीम मास्तर लिमये, गायन मास्तर गोडबोले, क्रीडाशिक्षक हणमंतराव भोसले, एम. जी. गोखले इ. सारखे नामवंत शिक्षक या शाळेला लाभले. तर साहित्यसेवेतून समाजकारणात रममाण झालेले, हिंदु-मुस्लीमांच्यात सांस्कअतिक मिलाफ घडवून आणणारे महापुरू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे ग्रंथकार, हिंदु-मुस्लीम समानतेचा ध्यास घेतलेले, सांगली-मिरज सिटी बसचे प्रणेते सय्यद अमीन, क्रिकेट क्षेत्रात सन्मानांची, पदकांची रास लावरारे जगविख्यात फलंदाज, गोलंदाज विजय हजारे, बॅडमिंटनच्या निर्जीव पुलाला जिवंत करून हवेत झोके ग्यायला लावणारे बॅडमिंटनपटु नंदु नाटेकर, कवीवर्य यशवंत, बाबासाहेब शिंदे (म्हैसाळकर), उद्योगपती आबासाहेब गरवारे, रंगा भागवत, बाबूलाल सोमाणी, केशवदेशपांडे, हुतात्मा आण्णासाहेब पत्रावळे, साहित्यिक श्रीनिवास शिंदगी, रावण जामदार, अॅड. केशवराव चौगुले, अॅड. बी. एस. कोरे, इ. काही आठवणीतील याशाळेचे विद्यार्थी! क्रिकेट, कबड्डी, खोखो, मल्लखांब, कुस्ती या खेळात सांगली हायस्कूलचे वर्चस्व आणि सांगली हायस्कूलचा एलेव्हन क्रिकेट संघ ' हे सांगली हायस्कूलच्या क्रीडाविश्वातील सोनेरी पान !
क्रीडाविश्वात जशी या शाळेची ख्याती आहे. तसेच सांगली हायस्कूल हे स्वातंयिचळवलीचे केंद्र होते. हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे हा विद्यार्थी ९वीमध्ये असताना इहग्रज अधिकाऱ्याच्या गोळीचा बळी ठरला. वर्गात तास चालू असतानाच हे विद्यार्थी एकमेकांकडे चिठ्या पाठवून आपल्या आंदोलनाचे नियोजन करीत.. तयाचा थांगपत्ता कुणाला लागत नसे.एकदा विद्यार्थ्यांनी कमानीवरील भलेमोठे घड्याळ की ज्याच्या आवाजाने अंकली, धामणीया गावातील नागरिक आपल्या कामाचे नियोजन करीत असत. तेच घड्याळ फोह्ण्याचा कट शिजला. त्याची कुणकुण मुख्याध्यापक एम. जी. गोखले यांना लागताच ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले ` जर घड्याळ फोडून तुम्हाला स्वातंत्र्य मिळणार असेल तर मीच पहिला दगड उचलतो. फण लक्षांत ठेवा. या इमारतीला पुढे ताजमहालाचे रूप येईल' असे म्हणताच विद्यार्थ्यांनी आपले हात मागे गेतले. देशप्रेमी, कर्तव्यतत्पर, चारियिवान, मानी असेच विद्यार्थी सांगकली हायस्कूलच्या शिक्षकांनी गहवले हे वरील उदाहरणावरून स्पष्ट होते.
१ एप्रिल १९५३ पासून ही सरकारी ााळा संत्रशिक्षण चालविण्याच्या अटीवर लठ्ठे एज्नयुकेशन सोसायटीकडे हस्तांतर झाली. हा हस्तांतराचा विषय तसा मनोरंजकच.
प्राचार्य जी. के. पाटील सरांना सांगली हायस्कूल लठ्ठे संस्थकडे हस्तांतर करण्याचे श्रेय द्यावे लागेल. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यापूर्वी श्रीमतीबाई कळंत्रे अक्कांनी जैन महिला आश्रमातर्पे शिशुविहार, ट्ृेनिंग कॉलेज आणि प्रेथमिक ााळा या संस्था सुरू केल्या होत्या. स्व. अऱ्णासाहेब लठ्ठे यांनी केलेल्या समाजकार्याचा आदर्श दीपस्तंभासारखा तेवत रहावा या ैेतूने त्यांच्या नावाने ,खादी शिक्षण संस्था स्थापन करऱ्यरचा विचार सुरू होता. स्व. बी. बी. पाटील, स्व. मगनलाल शहा, श्रीमती कळंत्रे अक्का, स्व. धावनेकाका, प्राचार्य जी. के. पाटील हे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे निर्माते. नियोजित संस्थेचे कार्यकारी मंडल तयार झाले. मगनलाल ाहा यांची अद्यक्ष आणि प्राचार्य जी. के पाठील यांची सेक्रेयरी म्हणून निवड झाली. संस्था नोंदणीची जबाबदारी स्व. आर. सी. जैन यांच्यावर सोपविली आणि १९५१ साली स्व. आऱ्णासाहेब लठ्ठे यांच्या नावाने लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली ही संस्था रीतसर स्थापन जाली. १९५१ ते १९५३ या कालात या संस्थेचने बेडकीहाळ, मनेवाडी येथे हायस्कूल सुरू केले. कुरुंदवाडचे हायस्कूल मिळविऱ्राचे या मंडळाचे स्वप्न होते. मात्र ते न मिळाल्याचे दु:ख सर्वांच्याच मनात होते.
त्याच कालात सांगली हायस्कूल ही सरकारी शाळा कोणी संस्था चालवायला घेउ शकेल काय / याची सरकारकडून विचारणा सुरू होती. तेव्हा पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मा. पावटेसाहेब होते. सरकारच्या वतीने एकच अट घातलेली होती ती म्हणजे, या शाळेचा टेक्निकल विभाग चालविण्याची. हीच अट कमोठी अडचणीची, जबाबदारीची आणि कर्चिक होती. त्यामुळे कोणत्याच संस्था लवकरात लवकर निर्णय घेण्यास तयार नव्हत्या. परंतु जैन बोर्डींगसमोर उभे राहून आणि छापखान्यात काम करताना किडकीतून दिसणारे सांगली हायस्कूलचे देखणे, मोहक रूप प्राचार्य जी. के. पाटील सरांना स्वस्थ बसू देत नव्हते. शुभ्र चांदण्यांत पांढरीशुभ्र स्वच्छ इमारत स्वर्गीय अप्सरेसारखी त्यांना भासत असे. या जैन बोर्डींगचा आणि सांगली हायस्कूलचा काही ऋणानुबंध असावा असेच त्यांना वाटत असे. त्यामुळे कार्यकारी मंडळाची परवानगी न घेताच त्यांनी सरकारला होकार कलविला. मोठे आर्थिक संकट असलेने अनेकांनी त्यांना विदोध केला. परंतु मगनलाल शहांनी मोठा पाठिबा दिला. अपार कष्टाून, समस्त नागरिकांचा विरोध पत्करून स्व. वसंतरावदादा, धुळाप्पाण्णा नवले, श्रीमती कळंत्रे अक्का, स्व. यावंतराव चव्हाण, मा. दिनकरभाई देसाई यांच्या सहकार्यातून सांगली हायस्कूल टेक्निकल विभाग चालविण्याच्या अटीवर लठ्ठे ,ज्युकेशन सोसायठटीला चालविण्यास देण्याची घोषणा झाली.
सुरवातीला मुख्याध्यापक म्हणून प्राचार्य जी. के. पाटील यांची नेमणूक झाली. संस्थेचे सेक्रेटरी आणि मुख्याध्यापक असा दुहेरी व्याप वाढल्याने त्यांच्याऐवजी म. न. दोशी यांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करणेत आली. त्यानंतरच्या काळात मुख्याध्यापक बी. बी. घुगरे सर, एस. ए. पाटील सर, बी. वाय. मुल्ला सर, डी. जे चिप्रीकर सर, हनुमानभक्त क्रीहा शिक्षक ......... इ. कडक शिस्तिीच्या विद्यार्थीप्रिय शिक्षकांच्या सहवासात असंख्य विद्यार्थी घडले. कीर्तीमान झाले. प्रा. शरद पाटील, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, साहित्यिक श्रीनिवास शिंदगी आजही या शाळेच्या गुणवत्तेची साक्ष देत आहेत.
राष्ट्ृय कबड्डीपटु राजु भावसार, राजु आवळे, णंकर बावडे तसेच असिफ मुल्ला असे खेळाडू या शाळने दिले. तसेच कोल्हापूर परिक्षा मंडळाच्या गुणवत्ता यादीत महत्वपूर्ण स्थान पटकेविले आहे. आजही चिंचेचा तो वृक्ष मागे फिरून पहाणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांचे हसतमुखाने स्वागत करीत उभा आहे. शंभरीकडे झुकलेल्या आणि गेल्ल्या शंभर वर्षांत असंख्य विद्यार्थ्यांना अंगाखांद्यावर खेळू दिल्याने या इमारतीची होत चाललेली पडझड लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन माजी महापौर मा. सुरेश पाटील यांना पाहवली नाही. त्यामुळेच त्यांनी २००५ पासून संपूर्ण इमारतीच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला. देश विदेशातीलअनेक माजी विद्यार्थी, शिक्षक यांच्या आथिर्कक मदतीतून आज ही इमारत पुन्हा दुसरी शताब्दी साजरी करायला तयार झाली आहे.. ज्याकाळी स्वातंत्र्यप्रमाने भारावलेल्या विद्यार्थ्यांच्या हातून होत असलेली या इमारतीची माहडतोड भविष्यातील ताजमहाल म्हणून वाचविण्यात शिक्षकांना यश मिळाले. तो ताजमहाल पुन्हा आमराईच्या गर्द हिरवाईत शीतल चांदऱ्यात उभा राहून आपला ऐतिहासिक ठेवा जपण्यास सज्ज झाला आहे.
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments: